सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असणारे अनेक अनोळखी लोक एकमेकांच्या एकमेकांच्या संपर्कात येत आजेत. याचा लोकांना जितका चांगला फायदा होतोय तितकाच वाईटही! सोशल मीडियावरील व्हर्च्युअल मैत्री ( Dangerous Virtual Friendship) अडचणीत देखील आणू शकते. अशा घटना वारंवार घडत आहेत. नुकतीच एका महिलेने इन्स्टाग्राम च्या माध्यमातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला फसवले आहे.(Online fraud)
गुजरातमध्ये उसाला ४७०० भाव, मग महाराष्ट्रात २९०० एफआरपी का?, रघुनाथदादा पाटलांचा सरकारला सवाल
या महिलेने सेवानिवृत्त प्राध्यापकासोबत ऑगस्ट मध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. अँवा जुडीला या खोट्या नावाचा वापर करून या महिलेने ती इंग्लंड मधली असल्याचे प्राध्यापकाला सांगितले. हळूहळू ऑनलाइन गप्पा करत तिने प्राध्यापकांचा विश्वास संपादन केला.
‘या’ जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु; उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज
नंतर तिने अमेरिकेतील यूएसअ एअरब्रेक्स इन्व्हेस्टमेंट नावाच्या इन्व्हेस्टमेंट कंपनीबद्दल प्राध्यापकांना सांगितले. 20 हजार डॉलर गुंतवले असता एका महिन्याला 1 कोटी 40 लाख रुपये मिळतात असे प्रलोभन दाखवून या महिलेने सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पैसे घेतले.
शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र येणार? राज्यात नव्या युतीची नांदी! चर्चाना उधाण
ती एवढ्यातच थांबली नाही तर नंतर देखील तिने 11,750 डॉलर ची रक्कम प्राध्यापकांना मागितली. “तुमच्या खात्यात 1,75,000 डॉलर जमा झाले आहेत, परंतु यासाठी काही दंड भरावा लागेल.” असे म्हणत तिने हे पैसे घेतले. मात्र नंतरच्या काळात तिने काहीच रक्कम प्राध्यापकांच्या खात्यात जमा केली नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा घटना टाळण्यासाठी सोशल मीडियाचा (Use of social media) वापर विचारपूर्वक व काळजीने करणे आवश्यक आहे.
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय