दिवसेंदिवस प्रदूषणात ( Pollution) वाढ होताना दिसत आहे. वाढती कारखानदारी, बदलते राहणीमान आणि आणखी विविध कारणांनी पाणी, हवा व मृदा प्रदूषणात वाढ होत आहे. काळानुसार याचे परिणाम देखील सर्वांना दिसू लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणातील ( Ujani Dam) पाणी दूषित झाले आहे.
अंबानी कुटुंबातील छोटी सुनबाई राधिका नक्की कोण आहे? जाणून घ्या अधिक…
उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलला असून या पाण्याला उग्र वास येत आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या धरणातील केमिकल मिश्रित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पंतच्या अपघातानंतर दिनेश कार्तिकने सर्वांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला…
अशाप्रकारचे दूषित पाणी ( Polluted Water) शेतीसाठी वापरले जात असल्याने पिकांची उत्पादकता सुद्धा घटली आहे. परिणामतः शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय हे पाणी पिल्याने जनावरांना देखील धोका निर्माण होणार आहे.
‘या’ कंपनीचं कफ सिरप घेतल्यानं 18 बालकांचा मृत्यू
इतकंच नाही तर उजनीच्या दूषित पाण्याने मासे व पाण्यात राहणाऱ्या इतर जीवांचा मृत्यु होत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती संशोधमधून पुढे आली असून उजनी पाणलोट क्षेत्रातील गावे दुर्गंधीच्या फेऱ्यात अडकली आहेत. यामुळे प्रशासनाने यावर कायमचा उपाय करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गौतमी पाटीलच्या डान्सवर माधुरी पवारची प्रतिक्रिया, म्हणाली, “तर कलाकाराच्या कलेचा आदर…”