आजकाल अन्नपदार्थांमध्ये फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. भेसळयुक्त पदार्थांची बाजारात रेलचेल आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. विरार येथे यासबंधीत नुकतीच एक घटना घडली आहे. एका नामांकित कंपनीच्या दुधाच्या पॅकेट मध्ये झुरळ सापडल्याची माहिती समोर येत आहे.
जोपर्यंत काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही; राजू शेट्टी आक्रमक
ज्ञानेश्वर खरे यांनी गुड मॉर्निंग ( Good Morning Milk Company) नामक कंपनीच्या एक लिटर दुधाचे पॅकेट घेतले होते. परंतु, या पॅकेट मध्ये त्यांना काळ्या रंगाचे झुरळ तरंगताना पहायला मिळाले. हा प्रकार त्यांनी दुकानचालकास सांगितला व नंतर दूध वितरक कंपनीच्या कानावर घातला.
मनसेकडून गृहमंत्रालयाला इशारा; गौतमी पाटील वर कारवाई करा अन्यथा…
मात्र दूध वितरक कंपनीने यावर कोणतेच समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे ज्ञानेश्वर खरे यांनी या प्रकाराची माहिती ठाणे अन्न व औषध विभागात दिली. ( Thane Food And Drug Department) यावेळी प्रशासनाचे प्रमुख परमेश्वर सिंगदवार हे उपस्थित होते.
दिलासादायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला ३५०० रुपये दर
दुधाचे पॅकिंग सुरू असताना गुड मॉर्निंग कंपनीमध्ये हा प्रकार झाला असावा असे परमेश्वर सिंगदवार यांचे मत आहे. दरम्यान संबंधित कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल असे ठाणे अन्न व औषध विभागाकडून सांगण्यात आले आहे.
संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश