सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. उन्हाळ्यात गार पदार्थ खाल्ल्याने बरे वाटते. बऱ्याच लोकांना थंड पाणी पिण्याची सवय लागलेली असते. उन्हाळ्यामध्ये तर अनेक लोक बर्फाचे पाणी किंवा फ्रीजमधील पाणी पिण्यास जास्त पसंती दर्शवतात. पण तुम्हाला माहित आहे का की थंड पाणी आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात फ्रिजमधील पाणी पिण्याचे तोटे…
पचनक्रिया बिघडते
आयुर्वेदानुसार थंड पाणी पिल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. थंड पाणी पिल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी उष्णतेची गरज असते. मात्र, थंड पाणी शरीरात गेल्यामुळे ही सर्व उष्णता थंड पाणी गरम करण्यास मदत करते. त्यामुळे हा धोका निर्माण होऊ शकतो.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते
फ्रिज मधील थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक ड्रिंक पिल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कुमकुवत होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल तर आपण सहज कोणत्याही रोगास बळी पडू शकतो.
लग्न झाले, नवऱ्याने हनिमूनचं प्लॅनिंगही मात्र तिने…, बीडमधील घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का
थंड पाणी पिल्याने लठ्ठ माणसांना होतो ‘हा’ तोटा
अतीशय लठ्ठ माणसांनी थंड पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढत जाते. थंड पाण्यामुळे शरीरात साठलेली चरबी जळत नाही. त्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. तसेच थंड पाणी पिल्यामुळे दात देखील कमकुवत होतात.
दरम्यान, उन्हाळा थंड पाणी पिल्यामुळे डोकेदुखी, सर्दी, फ्लूची समस्या, किंवा मायग्रेन यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ही सवय तुमच्यासाठी पचन, रक्ताभिसरण आणि शरीरातील विष्णू पदार्थ काढून टाकण्यासाठी चांगला पर्याय आहे.