सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ खातात. यामुळे घसा थंड होतो. कलिंगड हे उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे फळ आहे. कलिंगडाने शरीर हायड्रेटेड राहते. (Hydrated Body) तसेच त्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे देखील मिळतात. एवढंच नाही तर कलिंगड खाल्ल्याने शरीरातील उष्णता देखील कमी होते. मात्र खूपदा आपण कलिंगड (Watermelon) चुकीच्या पद्धतीने खात असतो. यामुळे आपल्या शरीरास धोका निर्माण होतो. म्हणून कलिंगड खाताना खालील गोष्टी टाळा. (Summer Cravings)
१) मीठ टाकून कलिंगड खाणे
कलिंगड खाताना त्यावर साधे किंवा काळे मीठ टाकून खाणे लोकांना प्रचंड आवडते. परंतु, ही सवय चुकीची आहे. कलिंगडावर मीठ टाकल्याने त्याची चव वाढते. मात्र कलिंगडमधील पोषकतत्त्वे कमी होतात. जर तुम्हाला कलिंगडामधील पोषकतत्त्वांचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यावर मीठ टाकू नका.
२) कलिंगडासोबत तळलेले पदार्थ किंवा अंडी खाणे
तळलेले पदार्थ व कलिंगड सोबत खाणे योग्य नाही. असे पदार्थ कलिंगडासोबत खाल्ल्याने कलिंगडाच्या रसाचा पूर्ण फायदा मिळत नाही. एवढेच नाही तर अंडी आणि कलिंगड हे वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतात. त्यामुळे ते एकत्र खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.
३) कलिंगडावर साखर टाकून खाणे
अनेक लोकांना कलिंगडावर साखर टाकून खायला आवडते. परंतु, फळांवर साखरेचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात. यामुळे मधुमेहाची समस्या उदभवू शकते. तसेच तुमचे वजन देखील वाढू शकते. त्यामुळे कलिंगडावर साखर टाकून खाणे टाळावे.