मानवी आहारात अंड्याला विशेष महत्त्व आहे. उत्तम आरोग्यासाठी बरेच लोक ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ हा फंडा वापरतात. नाश्त्यामध्ये लोकांना अंडी खायला आवडतात. अंड्यामध्ये असणारे पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने अंडे (Eggs) खातो. उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा हाल्फ बॉईल करून अंडे खाल्ले जाते. मात्र अंडे खाण्याची योग्य वेळ ( proper time) तुम्हाला माहिती आहे का?
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!
योग्य वेळी अंडी खाल्ली तरच अंडी खाण्याचा फायदा होतो. म्हणून, जाणून घेऊयात अंडी खाण्याच्या योग्य वेळा …
1) नाश्त्याला: नाश्त्याच्या वेळी जर तुम्ही अंडी खाल्लीत तर तुमच्या शरीराला अगदी सहजपणे मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि प्रोटीन सारखी पोषकतत्त्वे मिळतात. अंड्याचा नाश्ता हा हेवी असतो यामुळे सतत भूक लागत नाही.
2) व्यायाम केल्यानंतर: व्यायाम केल्यानंतर तुमची एनर्जी कमी होते. यामुळे तुम्हाला प्रचंड भूक लागते. अशावेळी तुम्ही भूक भागवण्यासाठी अंडी खाऊ शकता. आपल्या मांसपेशींसाठी अंडी फार फायदेशीर असतात.
3) रात्रीच्या जेवणानंतर: रात्री जेवणानंतर शांत झोप येण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकतात.
शेतकरी घरातील मुलाचे गौतमी पाटीलला थेट पत्र; म्हणाला, “लग्न करा म्हणायची वेळ…”
अंडी खाण्याचे फायदे –
1) अंड्यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात. याचा फायदा चांगल्या आरोग्यासाठी होतो.
2) अंड्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्त्वे असतात.
3) अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात असणारे अमिनो ऍसिडस् मांसपेशींसाठी चांगले असतात.
4) अंड्यामध्ये अँटी ऑक्सिडंटस (Anti Oxidents) सुद्धा असतात.