Site icon e लोकहित | Marathi News

सावधान! पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाची मोठी माहिती

Beware! Heavy rain warning in Pune; Great information from weather department

अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाला अखेर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार? भाजपने सांगितलं मोठं कारण; व्हायरल ट्विटने उडाली खळबळ

मुंबईमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनो पेरणी करत असाल तर थांबा! कृषी विभागाचा अंदाज जाणून घ्या मगच पेरणी करा

पुणे वेधशाळेच्या म्हणण्यानुसार, पुणे शहर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होणार आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असून आणखी 5 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने स्पष्ट सांगितले

Spread the love
Exit mobile version