Havaman Andaj । भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागात रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांबाबत 4 ऑगस्टला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
Tansa River । गटारी पार्टीसाठी गेलेले ५ तरुण तानसा नदीत कारसह वाहून गेले; १ मृत, १ बेपत्ता
पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्याचवेळी, गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असतानाही, पुणे आणि सातारा किनारी भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मैदानी भागातही हलका पाऊस पडू शकतो.
Mumbai News । मुंबईत मोठी दुर्घटना! इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅब कोसळला
हिमाचलमध्ये ७ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
ढग फुटल्याने आणि मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अचानक पूर आणि भूस्खलन झाले, त्यामुळे 114 रस्ते बंद झाले आहेत. 7 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या म्हणण्यानुसार, वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यांपैकी 36 मंडीत, 34 कुल्लू, 27 शिमल्यात, आठ लाहौल आणि स्पिती, कांगडामध्ये सात आणि किन्नौर जिल्ह्यातील दोन आहेत.
BSNL 5G Service । BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार, सरकारने चाचणीनंतर दिला ग्रीन सिग्नल