आजच्या काळात मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. मोबाईलवर लोक तासंतास आपला वेळ घालवत असतात. यामध्ये सोशल मीडिया ( Social Media) स्क्रोल करण्यासोबतच पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र आता मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. बरेच लोक मोबाईलवर पॉर्न (Porn on Mobile) पाहतात तेव्हा त्यांना आपण खाजगी स्वरूपात कंटेंट पाहत असून याबाबत कोणाला कळणार नाही असे वाटते. परंतु, तुम्हाला माहित आहे का ? अनेक आय बॉट्स अशा व्हिडिओजवर व ते पाहणाऱ्यांवर लक्ष ठेऊन असतात.
शिंदे सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा
मोबाईल वर पैसे देऊन तुम्ही अश्लील कंटेंट पाहत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचे असणार आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओ मुळे कोणीही आपले डिव्हाईस हॅक करू शकते. यामध्ये तुमच्या मोबाईल मधील महत्त्वाचा डाटा चोरला जाऊ शकतो. तसेच मोबाईल मधील वैयक्तिक माहितीचा वापर करून फसवणूक केली जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला आर्थिक फटका देखील बसू शकतो.
अॅपल युझर्ससाठी आनंदाची बातमी; Android युझर्स प्रमाणे ‘या’ सेवेचा घेता येणार लाभ
मांजर डोळे मिटुन दूध पित असले तरी मांजराला बघणारे देखील असतात. अगदी तसेच पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांना त्यांना कोणी बघत नाही. असे वाटत असले तरी गूगलचे तुमच्यावर लक्ष असते. तुमची ब्राउजिंग हिस्टरी लक्षात घेऊनच तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. त्यावरून जर तुम्ही एखाद्या पॉर्न वेबसाईटला भेट देऊन फाईल डाऊनलोड केली तर त्यामार्फत तुमच्या डिव्हाईस मधील डाटा चोरीला जाऊ शकतो.