Kolhapur Rain । सावधान! कोल्हापूरकरांवर पुन्हा घोंगावतंय पुराचं संकट, पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

Beware! Kolhapurkars are facing flood crisis again, Panchganga river has reached the warning level

Kolhapur Rain । कोल्हापूर : राज्यात यंदा पावसाने (Rain in Maharashtra) उशिरा हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नदी नाल्यांना पूर येऊन धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कारण हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात देखील पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. (Latest Marathi News)

Mumbai Pune Expressway । पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कोसळली दरड, वाहतुकीवर झाला खूप मोठा परिणाम

जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीने (Panchganga river) इशारा पातळी गाठली असून प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेली असून, आज राधानगरी धरण (Radhanagari Dam) पूर्ण क्षमतेने भरू शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता येथील नागरिक स्थलांतर करत आहे.

Irshalwadi Landslide । मोठी बातमी! फक्त आठवणी उरल्या… इर्शाळगडावरील शोधकार्य आजपासून बंद

तसेच पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांना पूर आलेला आहे. दरम्यान, 2019 आणि 2021 च्या महापुराचा फटका बसलेला कोल्हापूर जिल्हा या वर्षी देखील महापुराच्या विळख्यात सापडू शकतो. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. त्याशिवाय अनेक मार्गावर पाणी साचले असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Pune Crime । पुणे हादरलं, पोलीस अधिकाऱ्यानेच केली पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या; स्वतःचेही संपवलं जीवन

Spread the love