आजकाल पैशाशिवाय काही मिळत नाही. त्यामुळं पैसा हा सर्वांना महत्त्वाचा वाटतो. त्यामुळं झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग लोकांना कायम आकर्षित करतो. लॉटरी (Lottery) हा यातलाच एक मार्ग आहे. परंतु, लॉटरीमुळे आर्थिक फसवणूकींच्या (fraud) घटनांमध्ये वाढ होत आहे. जळगाव येथे एका विवाहितेला लॉटरीचे आमिष दाखवून नुकतेच फसविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय
जळगाव मधलं या महिलेला लॉटरी लागली आहे, असे सांगून ऑनलाइन फसविण्यात आले आहे. यामध्ये या विवाहितेचे एकूण 50 हजारांचे नुकसान झाले आहे. या महिलेला अनोळखी नंबर वरून लॉटरी लागल्याचा कॉल आला होता. परंतु खोटा कॉल समजून त्यांनी हा कॉल कट केला. यानंतर मात्र त्यांना व्हाट्सएपवर लॉटरी लागल्याचा मेसेज आला.
फॉर्म १०A सबंधी आयकर विभागाचा आऊटरिच कार्यक्रम पार पडला!
यावेळी मात्र त्या फसल्या आणि त्यांनी हजारांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली. नंतर लॉटरीच्या पैशांची मागणी केली असता, आपली फसवणूक झाले असल्याचे यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार नोंदवली.