आजारांचा धोका वाढतो तो पावसाळ्यानंतर वाढणाऱ्या डासांमुळे. कारण डासांच्या (mosquitoes) विषारी डंकामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. याचच उदाहरण म्हणजे पावसाळ्यात (rainy season) पसरणाऱ्या डासांमुळे झिका विषाणू, मलेरिया, चिकनगुनिया आणि डेंग्यूसारखे आजार होऊ शकतात. आपण पाहतो की, डासांचा सामना करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. परंतु या गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुम्ही घरामध्ये असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा (natural things) उपयोग करून डासांचा नाश करू शकता.
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 72 तासांच्या आतच नुकसानीची पूर्वसूचना द्यावी लागणार
1)स्वयंपाकघर-कपाटात ठेवा कापूर- वॉशरूम, स्वयंपाकघर किंवा कपाटात ठेवलेल्या कापूरचा वास डासांना बाहेर काढू शकतो.तसेच घराच्या खोलीच्या आत किंवा बाल्कनीच्या कोपऱ्यात कुठेही लहान भांड्यात कापूर ठेवा. साधारण ३० मिनिटांत कापूरचा वास घरभर पसरेल आणि तिथे डास येणार नाहीत.
2) नॅचरल स्प्रे ऑफ लसण- भाज्यांमध्ये जेवणाची चव वाढवणारा लसूण तुम्हाला नैसर्गिक स्प्रे म्हणूनही उपयोगी पडू शकतो. यासाठी लसूण पाण्यात उकळा.त्यानंतर हे पाणी एका बाटलीत भरून स्प्रेप्रमाणे घराच्या कानाकोपऱ्यात फवारावे.असे केल्याने डास पळून जातील.
सोने-चांदी खरेदी करताय? किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर
3) कॉफीने डासांचा नायनाट करा- कोणत्याही व्यक्तीच्या घरात कॉफी घेणे फार कठीण काम नाही.तुम्हाला माहित आहे का की कॉफीच्या वापराने आजार पसरवणाऱ्या या डासांपासून सुटका होऊ शकते. डास बहुधा एकाच ठिकाणी साचणाऱ्या घाणेरड्या पाण्यात प्रजनन करतात.या पाण्यात थोडी कॉफी टाकून डासांपासून आराम मिळतो.
4) लॅव्हेंडर ऑइलची फवारणी- लॅव्हेंडर तेलाच्या सुगंधासमोर डासांना जगणे कठीण जाते. तुमच्या आजूबाजूला किंवा घरात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लॅव्हेंडर ऑइलची फवारणी करा. तुम्हाला हवे असल्यास हे सुगंधी तेल तुम्ही तुमच्या हातांवर आणि पायाला क्रीम म्हणून वापरू शकता.
5) पेपरमिंट ऑइल- पुदिन्याच्या वासानेही डास दूर होऊ शकतात. यासाठी तुम्ही पुदिन्याच्या तेलाची एक कुपी तुमच्या आजूबाजूला ठेवू शकता. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये पुदिन्याचे रोप देखील ठेवू शकता.
Herbs For Joint Pain: गुडघेदुखीने त्रस्त आहात? अवश्य वापरा या औषधी वनस्पती, मिळेल आराम