Site icon e लोकहित | Marathi News

सोशल मीडियावर अफवा पसरवताय तर सावधान! अन्यथा होऊ शकते आजन्म कारावासाची शिक्षा

Beware of spreading rumors on social media! Otherwise the punishment can be life imprisonment

आजकाल लहानांपासून-थोरांना सोशल मीडियाचे आकर्षण आहे. ‘सोशल मीडियावर अपडेट राहणे’ हा लोकांचा छंदच बनला आहे. यासाठी सोशल मीडिया वापरकर्ते वाटेल त्या थराला जातात. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले ( Vikram Gokhle) यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर ( Social media) सुरू असणाऱ्या अफवांनी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणलाय. पण तुम्हाला माहित आहे का? सोशल मीडियावर अशा अफवा पसरवणे तुम्हाला महागात पडू शकते.

अरे वा! रानडुकरांना शेतातून पळवण्यासाठी शेतकरी पुत्राने केली वेगळी आयडिया; वाचा सविस्तर

सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी, आपले सोकॉल्ड सोशल स्टेटस जपण्यासाठी लोक सोशल मीडियावर एखाद्या घटनेबाबत पोस्ट करण्याची घाई करतात. सगळ्यात आधी माहिती कोण देतंय? याची चढाओढ त्यांच्यात लागलेली असते. यामुळे बऱ्याचदा माहिती न पडताळता पुढे पाठवली जाते. याचाच परिणाम म्हणून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरली जाते. परंतु, अशी चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याने गुन्हा (Crime of fake news) आहे. यासाठी कठोर व गंभीर शिक्षांची तरतूद कायद्यात आहे.

“हे माता कामाख्या देवी..”, शिंदे गटापूर्वी रोहित पवारांची कामाख्या देवीला प्रार्थना

‘हे’ कायदे लक्षात ठेवा –

1) कुठल्याही घटनेबाबत अथवा व्यक्तीबाबत कोणीही एखादे विधान, वृत्त व अफवा प्रसिद्ध करत असेल आणि यामुळे त्या भागात व जनतेमध्ये संभ्रम व भीती निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता, १८६० कलम ५०५ अंतर्गत 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच दंडद्रव्याची शिक्षा देखील होऊ शकते.

2) कोणतीही पोस्ट मेसेज किंवा विधान पाठवून भारताच्या सार्वभौमत्वाला व स्वायत्ततेला धक्का पोहचवून एखादी व्यक्ती दहशत निर्माण करत असेल तर माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम 66 फ अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते .

शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले काय माहित? – अजित पवार

3) एखादी व्यक्ती आपत्तीच्या तीव्रतेबाबत काही अफवा किंवा चुकीची माहिती किंवा खोडसाळ विधान करत असेल तर अशा व्यक्तीस आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५४ अंतर्गत १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

4) याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट्स टाकणारे सदस्य , ग्रुप ऍडमिन्स व कंटेंट क्रिएटर्स यांच्यावर भारतीय दंड संहिता, १८६० कलम १५३(अ) व कलम १५३ (ब) अंतर्गत 3 वर्षापर्यंतच्या कारावास किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज आमदारांसह गुवाहाटीला रवाना

Spread the love
Exit mobile version