मच्छरांपासून वाचण्यासाठी आपण बऱ्याचदा डास मारण्याच्या कॉईलचा वापर करत असतो. यासाठी आपण कॉईल पेटवून ती आपल्या जवळ ठेवत असतो. मात्र सध्या याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी एकूण तुम्हाला देखील धक्का बसेल.
मोठी बातमी! ‘त्या’ व्हायरल व्हीडिओप्रकरणी सरपंचाविरोधातच पोलिस तक्रार
दिल्ली या ठिकाणी डास मारणाऱ्या कॉईलमुळे सहा लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडली अशी की, डास मारायच्या कॉईलमुळे गादीला आग लागली आणि त्यानंतर गादीला आग लागल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे गुदमरून धुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जीवे मारण्याच्या धमकीनंतर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
सूत्रांच्या माहितीनुसार, डास मारण्याच्या कॉईलमुळे गादीने पेट घेतला अन् आग लागली आणि त्यामुळे झालेल्या धुरात गुदमरून कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू झाला. आग लागल्यांनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या त्याचबरोबर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्या सहा लोकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक