
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातल आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. हवामानातील बदलामुळे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या ७ आठवड्यापासून कोरोना रुगणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
मालेगावमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार; आज होणार जाहीर सभा
कालच्या तुलनेमध्ये आज देखील देशात कोरोनाचा एक नवीन रुग्ण नोंदवण्यात आला आहे. मागच्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या 1956 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर काल दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! 15 ते 20 महिला पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार
आज देशामध्ये कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले असून कोरोना संसर्गामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात तीन, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढले आहे.
इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलवार केली जोरदार टीका; म्हणाले, “तिच्या कार्यक्रमात…”