
मागील आठवड्यात एका भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे उजबेकिस्तानमधील १९ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर मरीन बायोटेक या भारतीय कंपनीची चौकशी सुरू होती. दरम्यान या दोन्ही कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) याबाबत इशारा दिला आहे. हे दोन्ही कफ सिरप गुणवत्तेच्या कसोटीमध्ये उतरली नाहीत अशी माहिती WHO कडून देण्यात आली आहे.
नितेश राणेंना अमोल कोल्हेंचे प्रतिउत्तर; म्हणाले,”वडिलांच्या कर्तृत्वावर…”
उजबेकिस्तानच्या १९ बालकांचा मृत्यू या कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपने झाल्याचे लक्षात येताच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. ambronol सिरप आणि DOK-1 Max सिरपची विक्री बाजारात थांबविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. सांगण्यात आलंय. हे सिरप बनवणाऱ्या मरीन बायोटेक कंपनीचे कार्यालय नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे.
राज्यात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
उजबेकिस्तान मंत्रालयाने केलेल्या तपासणीमध्ये दोन्ही औषधींमध्ये डाईथिलीन ग्लाईकोल आणि इथिलीन ग्लाईकोलची मात्रा जास्त दिसून आली. यामुळे त्या बालकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर भारताच्या आरोग्य मंत्रालयानं या औषधाच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारने देखील या औषध कंपनीचे लायसन रद्द केले आहे.