Goat Disease । अनेकांना शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे ते शेळीपालन (Goat rearing) आणि मेंढीपालन (Sheep farming) व्यवसायाकडे वळतात. तुम्ही देखील आता या व्यवसायातून बंपर फायदा मिळवू शकता. जर तुम्ही हा व्यवसाय करत असाल तर तुम्ही शेळी आणि मेंढीची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. (Latest Marathi News)
Na Dho Mahanor । रानकवी ना.धों. महानोर कालवश! ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सध्या पीपीआर (PPR) हा एक विषाणूजन्य आजार शेळी आणि मेंढ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अचानक उदासीनता, डोळे आणि नाकातून स्राव, ताप, तोंडात फोड येणे, श्वासोच्छ्वासास अडथळा आणि खोकला, दुर्गंधीयुक्त अतिसार यांसारखी लक्षणे या आजाराची आहेत. परंतु काळजी करू नका, कारण यावर उपचारासाठी प्रभावी लाइव्ह अॅटेन्युएटेड पीपीआर व्हायरस लस उपलब्ध आहे.
Ajit Pawar । अजित पवार बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, राजकीय वर्तुळात खळबळ
कसा होतो आजाराचा प्रसार
- हा आजार हवेतील थेंबांद्वारे पसरतो.
- समजा हा आजार गरोदर माद्यांना झाला तर त्यांचा गर्भपात होतो.
- या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोळ्यातील श्लेष्मल त्वचा लाल होते.
- ओठ सुजलेले आढळतात. तसेच त्यांच्या तोंडाभोवती नोड्यूल दिसतात.
त्वरित करा हा उपाय
- या आजाराच्या नियंत्रणासाठी लस ३ ते ४ महिने वयाच्या शेळ्या, मेंढ्यांना दर तीन वर्षांनी द्या.
- आजारी शेळ्या आणि मेंढ्यांची योग्य ती काळजी घ्या.
Nitin Desai । नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर