IMD Weather Forecast । पुणे : जसा ऑगस्ट महिना सुरु झाला तसा राज्यातून पाऊस (Rain in Maharashtra) गायब झाला आहे. अगोदरच राज्यात उशिरा पावसाने (Rain) हजेरी लावली आहे, त्यात आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते. अशातच आता एक दिलासादायक बातमी आहे. (IMD Alert)
Mukesh Ambani । अखेर झाली घोषणा! ‘या’ दिवशी जिओचा शेअर करणार बाजारात धमाका
राज्यातील पाऊस सध्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लांबणीवर पडला आहे. पुणे हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस पडेल. आजपासून कोकण आणि विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस हजेरी लावेल. तर हवामान खात्याकडून मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि जळगावला पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
तसेच पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये देखील पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain in Pune) पडेल. मुंबई, ठाणे, रत्नागिरी पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान अनेक भागातील पिके पाण्याविना जळू लागली आहेत. परंतु आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला आहे.
Banana with Milk । दूध आणि केळीचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी कितपत फायद्याचे आहे? वाचा