आजकाल सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजकाल तरुणांच्यात मोबाईलवर ऑनलाइन गेम (Online Game) खेळणे हा छंद पहायला मिळतो. मात्र याच छंदापायी एका तरुणाने चक्क ४० लाख रुपये गमावले आहेत. यामुळे हा तरुण कंगाल झाला असून त्याच्यावर स्वतःची शेती विकण्याची वेळ आली आहे.
राज्यात राजकीय भूकंप? अजित पवार अस्वस्थ, कधीही काहीही होऊ शकतं; शिंदे गटातील मंत्र्यांच मोठं वक्तव्य
मॉस्ट बेट (Most Bet) या गेममध्ये तरुणाने लाखो गमावले असून त्याच्या गावातील अनेक तरुण या गेमच्या आहारी गेले आहेत. जालना जिल्ह्यातील ढगी गावातील हे तरुण आहेत. ऑनलाइन जुगार खेळत असताना या तरुणांनी लाखो रुपये गमावले आहेत. परमेश्वर केंद्रे या तरुणाचे या गेममध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. यामुळे त्याला स्वतःची शेती विकावी लागली.
मोठी बातमी! भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊतांची दौंडमध्ये 26 एप्रिलला सभा
सध्या उदरनिर्वाहासाठी परमेश्वरने स्वतःची पानटपरी सुरू केली आहे. मागील एक वर्षापासून परमेश्वर मॉस्ट बेट ही गेम खेळत होता. अगदी सुरुवातीच्या काळात त्याने १०० व १००० रुपयांमध्ये हा गेम खेळला. यातून त्याला चांगला फायदा देखील झाला. मात्र, नंतर त्याने हजारो रुपयांची गुंतवणूक केली. यासाठी त्याला स्वतःची जमीन विकावी लागली आणि शेवटी तो तब्बल ४० लाख रुपयांना बुडाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परमेश्वरने पोलिसांत तक्रार केली. मात्र पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट जमा करायला लावले.