Bhandara News । भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज मोठा स्फोट झाला. आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये झालेल्या या स्फोटात इमारतीचे छत कोसळून 13 ते 14 कामगार मलब्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, त्यात पाच कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Tomato Rate । शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता; टोमॅटोला मिळतोय कवडीमोल भाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर माहिती दिली की, स्फोटाच्या घटनेत दुर्दैवाने एक कामगाराचा मृत्यू झाला असून इतर जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ आणि नागपूर महापालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, संरक्षण दलाने मदत कार्यात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे.
Sharad Pawar । उद्धव सेना पुन्हा फुटणार? शरद पवारांनी दिली थेट मोठी प्रतिक्रिया
स्फोट कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण स्फोटकं बनवणारी कंपनी असलेल्या या फॅक्टरीमध्ये साबुदाणा प्रमाणक कच्चा माल जो आरडीएक्स तयार करण्यासाठी वापरला जातो, त्यात स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मदत कार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून, मृतक कामगाराच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करण्यात आला आहे.
Politics News । राजकारणात मोठी उलथापालथ होणार; बच्चू कडूंचा धक्कादायक दावा