आपला देश कितीही विकसित झाला तरी देशात आजही मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ आहे. (Religion) यामुळे दंगली, मारहाण यांसारखे प्रकार सतत घडत असतात. दरम्यान संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंदू मुलासोबत ( Hindu Boy) फिरते म्हणून एका मुस्लिम मुलीवर भररस्त्यात मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखक केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्या मुलीच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनीच ही मारहाण केली आहे.
‘या’ कारणामुळे उर्फी जावेदला मुंबई मधील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही; वाचून बसेल धक्का
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Viral Video)मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी तिच्या एका मित्राला भेटायला गेली होती. भेट घेऊन परत परतत असताना, काही ओळखीच्या मुलांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला व तिला त्रास देण्यास सुरुवात केली. हे तरुण तिला शिवीगाळ सुद्धा करत आहेत.
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी समोर आली धक्कादायक बातमी
एवढंच नाही तर टवाळखोर तरुणांनी त्या मुलीचा बुरखा देखील फाडला. हे सर्व घडत असताना त्या तरुणीसोबत असणारे मित्र मैत्रिणी देखील निघून गेले. यानंतर त्या तरुणांच्या टोळक्याने पीडित मुलीला बेदम मारले. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामुळे या तरुणांवर कारवाई केली जावी. अशी मागणी सर्वत्र होत आहे. परंतु, तरुणीच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्वतःच तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे.
आनंदाची बातमी! घरकुल योजनेतील लोकांना मिळणार मोफत वाळू; नवीन शासन निर्णय जारी