Bharat Gogawale । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) पक्ष फूट पडल्यापासून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. पण त्यापूर्वी ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. (Latest marathi news)
Maratha Reservation । मोठी बातमी! मनोज जरांगे करणार पुन्हा आमरण उपोषण
नुकताच ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला होता. जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत भरत गोगावले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘भास्कर जाधव हा आता कासावीस झालेला माणूस आहे. कारण जाधव यांच्या मतदारसंघात महायुतीच्या आमदारांनी नेत्यांनी विकास कामांचा धूमधडाका लावला आहे,’ अशा शब्दात भरत गोगावले यांनी समाचार घेतला आहे.
विकासकामांमुळे भास्कर जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. ते आता कितीही आव आणून बोलत असले तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ संधान साधलं होतं. त्यावेळेला काय करायचं काय नाही, याच्या चर्चा झाल्या होत्या. तेव्हा काय चर्चा घडल्या होत्या, आम्ही तिथे सामोरे होतो; असेही भरत गोगावले म्हणाले आहेत. दरम्यान, भरत गोगावले यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.