मागील काही दिवसांपासून राज्यभरात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची चर्चा होती. सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या या यात्रेचा काल (दि.30) समारोप झाला. मागच्या दीड दशकात काँग्रेसचे झालेले नुकसान ‘भारत जोडो यात्रेने’ ( Bharat Jodo Yatra) भरून निघेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार
अगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election) काँग्रेसला ही यात्रा फलदायी ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या काही वर्षात राहुल गांधी यांची ‘पप्पू’ मुळे बिघडलेली प्रतिमा बदलण्यास ही यात्रा कारणीभूत ठरली आहे.
भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला अगदी हलक्यात घेतले. मात्र कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ही यात्रा जशी जशी पुढे सरकू लागली तसे भाजपच्या देखील तोंडचे पाणी पळाले. सुरुवातीला राहुल गांधी ( Rahul Gandhi) देखील सातत्याने भाजपला टोला लावत होते.
अदानी ग्रुपसाठी धक्कदायक बातमी, गौतम अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
मात्र नंतर नंतर त्यांनी देखील वेगळंच राजकारण केले आणि लोकांशी जवळीक वाढवण्यासाठी सुरुवात केली. सामान्य लोकांच्यात जाऊन मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे असे कार्यक्रम सुरू केले. यामध्ये त्यांनी थेट लोकांच्या भावनांशी मिळतेजुळते राहण्याचा प्रयत्न केला.
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती
परिणामतः लोकांचा सहभाग आणखी वाढला. भारत जोडो यात्रेला वेगळे वळण मिळाले. ही यात्रा राजकीय नसून लोकांशी संवाद साधण्यासाठी आहे असा अजेंडा काँग्रेसने पसरवला. यामुळे राहुल गांधी लोकांचा विश्वास संपादन करत गेले.
काँग्रेसच अस्तित्वच उरलं नाही असं म्हणणाऱ्या लोकांना या यात्रेमुळे चांगलीच चपराक बसली आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला इतका फायदा झालाय की, अगामी काळात काँग्रेस समविचारी पक्षांशी संधान साधून राहिले तर लोकसभेत भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
सुषमा अंधारे ‘स्टूलवाली बाई’! ‘या’ बड्या नेत्याने केली जोरदार टीका