Site icon e लोकहित | Marathi News

Loksabha election । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! पत्नीला तिकीट न दिल्याने ‘या’ आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

Loksabha election

Loksabha election । लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha election 2024) राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जागावाटपावर अजूनही चर्चा सुरु आहे. अनेक नेतेमंडळी तिकीट न दिल्याने पक्षांतर करत आहेत. काँग्रेसच्या (Congress) एक आमदाराने पत्नीला तिकीट न दिल्याने चक्क राजीनामा दिला आहे. (Latest marathi news)

Devendra Fadnavis । निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव, शरद पवारांना दिला मोठा धक्का

आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील आमदार भरत नराह (Bharat Narah) यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला. दरम्यान, काँग्रेसने सोमवारी सहावी यादी जाहीर केली असून यात राजस्थानधील चार उमेदवारांचा तर तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. आमदार भरत नराह यांनी त्यांच्या पत्नी राणी नराह (Rani Narah) यांच्यासाठी तिकीट मागितले होते.

Mumbai News । धुलीवंदनाच्या दिवशी भयानक दुर्घटना! समुद्रात पाच विद्यार्थी बुडाले

पण काँग्रेसने राणी नराह यांना उमेदवारी न देता उदय शंकर हजारिका यांना उमेदवारी दिली. राणी नराह या लखीमपूरमधून तीन वेळा खासदार आहेत. असे असले तरीही राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. या कारणामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Bjp । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का? ‘हा’ बडा नेता सोडणार भाजपची साथ

Spread the love
Exit mobile version