राज्यात मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato rates) गगनाला भिडले आहेत. यावर्षी चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी लखपती तर अनेक शेतकरी करोडपती झाला (Tomato Price Hike) आहे. याचा खूप मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने अनेकांच्या ताटातून टोमॅटो (Tomato)गायब झाला आहे. परंतु एक शेतकरी टोमॅटो नाही तर आल्याची (Ginger) विक्री करून लखपती झाला आहे.
धाराशीवमध्ये यंदा पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी इतर पिके न घेता आल्याची लागवड केली. कळंब तालुक्यातील गणेश पाटोळे या शेतकऱ्याने देखील अडीच एकर आल्याची लागवड केली होती. बाजारात सध्या आल्याला किलोला 120 ते 150 रुपये भाव (Ginger Price Hike) मिळत आहे. त्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात 45 लाख रुपयांचे उत्पन्न (Ginger Price) घेता आले.
Rain Update : चंद्रपूरमध्ये पुरस्थिती, मोठं मोठे बंगले बुडाले पाण्यात; समोर आले धक्कादायक फोटो
दरम्यान, त्यांच्याकडे आणखी माल शिल्लक आहे. आल्याचे दर कायम असल्याने त्यातून कोट्यवधी रुपये कमावता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आल्याच्या पिकातून लाखो रुपयांची कमाई करता आल्याने पाटोळे कुटुंबियात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हे ही पहा