Site icon e लोकहित | Marathi News

Tomato Price । भारीच की राव! टोमॅटोची चोरी थांबवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल, जाणून तुम्हीही व्हाल चकित

Bharich ki Rao! You will also be surprised to know the unique way the farmer fought to stop the theft of tomatoes

Tomato Price । मागील काही दिवसांपासून टोमॅटोने (Tomato) शंभरी पार केली आहे. अजूनही दर जैसे थे आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दर वाढल्यापासून (Tomato Price Hike) चांद्यापासून ते बांद्यापर्यंत टोमॅटोचीच चर्चा सुरु आहे. टोमॅटो विकून अनेक शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. काही दिवस हे दर (Tomato Rate) असेच राहणार आहे. परंतु सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये टोमॅटो बसत नाही. (Latest Marathi News)

Politics News | जयंत पाटील-जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा; आव्हाडांनी स्पष्टच सांगितले म्हणाले…

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यापासून गुन्ह्यांमध्येदेखील वाढ होत आहे. काहींचे तर टोमॅटोमुळे जीवही गेले आहेत. तर काही ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये टोमॅटोवरून वादही होत आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता टोमॅटोची चोरी थांबावी यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर गावच्या शरद रावते या शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे.

Share Market । गुंतवणूकदारांनो, ‘या’ महत्त्वाच्या शेअर्सवर ठेवा लक्ष; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

रावते यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या अडीच एकर शेतात टोमॅटोची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांना 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील आठवड्यात त्यांचे टोमॅटो बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येणार आहेत. परंतु त्यापूर्वीच त्यांच्या शेतातून टोमॅटोची चोरी होऊ लागली आहे. त्यामुळे ते हैराण झाले होते. अखेर त्यांनी यावर एक मार्ग शोधून काढला.

Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, केली मोठी मागणी

या शेतकऱ्याने थेट आपल्या शेतात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले आहेत. त्यासाठी त्यांनी एकूण 22 हजार रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे परिसरात सध्या त्यांच्या या भन्नाट आयडियाची जोरदार चर्चा होत आहे. या परिसरातील इतर शेतकरीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या विचारात आहेत.

Havaman Andaj । राज्यात किती दिवस पावसाची उघडीप? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Spread the love
Exit mobile version