Site icon e लोकहित | Marathi News

Bhavya Gandhi | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील टप्पू साकारणार मोठ्या चित्रपटात ‘मोठी’ भूमिका!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehata ka Oolta Chashma) ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील टप्पू तुम्हाला आठवतोय का ? हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरलेले पात्र होते. काही वर्षांपूर्वी टप्पू हे पात्र साकारणारा भव्य गांधी (Bhavya Gandhi) आजही लोकांच्या आवडीचा आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोविंग असून तिथे तो नेहमी सक्रिय असतो.

Petrol & Disel Fraud | पेट्रोलपंपावर अशी केली जाते फसवणूक ! पैशांसोबत गाडीचे देखील होते मोठे नुकसान

भव्य गांधीने अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. टप्पू या भूमिकेने त्याला मोठी ओळख दिली. अभ्यासाच्या कारणाने भव्यने ही मालिका सोडली होती. दरम्यान हा भव्य गांधी आता मोठा झाला असून लवकरच तो एका चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. सध्या लंडन येथे त्याच्या अगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अगामी ‘न्यु बिगिनिंग्स’ (New Beginnings) या चित्रपटात भव्य गांधी दिसणार आहे.

The kerala Story | फक्त १० वी शिकलेल्या अदा शर्माने द केरळ स्टोरी साठी घेतले ‘इतके’ कोटी रुपये; वाचा सविस्तर

याआधी भव्यने विविध गुजराती चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र यामधून त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. दरम्यान तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेतील महिला कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

धक्कादायक घटना! ताप येतं होता म्हणून तांत्रिकाला बोलावलं; अंगात भूत आहे म्हणून तरुणाला केले ठार

Spread the love
Exit mobile version