दौंड: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्यसरकारने नुकत्याच त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या राज्यातील बहुतेक कारख्यान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामध्येच आता भीमा सहकारी साखर कारखाना (Bhima Cooperative Sugar Factory) दि. १५ पासून सुरु झाला आहे. भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल याच्या अथक प्रयत्नानंतर हा कारखाना सुरू झाला आहे.
शिंदे सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा
भीमा सहकारी साखर कारखाना पाटस मागील तीन-चार वर्षांपासून बंद होता. त्यामुळे कारखाना सुरू होईल की नाही याबाबत सतत चर्चा होत असे. मात्र, आता कारखाना चालू झाल्याने दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर भीमा पाटस चालू झाल्याने सभासद शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, ट्रॅक्टर मालक-चालक यांना देखील दिलासा मिळाला आहे.
अॅपल युझर्ससाठी आनंदाची बातमी; Android युझर्स प्रमाणे ‘या’ सेवेचा घेता येणार लाभ
भीमा पाटस कारखाना हा एमआरएन (निराणी) समूहाने चालवायला घेतला आहे. दरम्यान, साखरेबरोबर आसवानी प्रकल्प आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून तसेच उपपदार्थ विक्रीतून कारखाना ऊस उत्पादक सभासद शेतकरी बांधवाना चांगला दर देईल असा विश्वास देखील राहुल कुल (Rahul Kul) यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवारांचा सरकारवर निशाणा; साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावर दर्शवला निषेध
देशाचे विद्यमान गृहमंत्री आणि सहकार मंत्री मा.ना.अमित शाह (Amit Shah), राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्ष नेते मा.श्री.अजित पवार यांच्या सहकार्याने भीमा पाटस कारखाना पुन्हा सुरु होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. असे राहुल कुल यावेळी म्हणाले.