भीमा पाटस साखर कारखान्यात ( Bheema Patas Sugar Factory) यंदा चांगल्या क्षमतेने ऊस गाळप झाला यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. दौंड ( Daund) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काचा समजला जाणारा हा कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद होता. मात्र, यंदाच्या वर्षी हा कारखाना सुरू झाला व चांगल्या पद्धतीने गाळप देखील सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कारखान्याचे पहिल्या पंधरवाड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असल्याचे माहिती कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांनी दिली आहे.
आफताबला वाजून आलीये थंडी पण कपडे घेण्यासाठी नाहीत पैसे…
या कारखान्याने पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रु. प्रति टनाप्रमाणे पहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, सध्या दिवसाला तीन ते साडेतीन हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप या कारखान्यात होत आहे. इतकच नाही तर, सरासरी ७.८० टक्के साखर उताराही निघत आहे. यावर्षीचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी कारखाना व्यवस्थापकांकडून प्रयत्न सुरु आहेत.