भीमजयंतीला लागले गालबोट; विरार मध्ये दोन भीमसैनिकांचा शॉक लागून मृत्यु

Bhimjayanti got cheeky; Two Bhimsainikas died of shock in Virar

राज्यात सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) यांची जयंती जोमात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांची रेलचेल सुरू असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. विरार येथे आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत शॉक लागून दोन भीमसैनिकांचा मृत्यु झाला आहे. एवढेच नाही तर तीन भीमसैनिक गंभीररित्या भाजले आहेत. या घटनेमुळे उत्साहात सुरू असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गालबोट लागले आहे.

राजकीय घडामोडींचा वेग! पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार

विरारमधील ( Virar) कारगिलनगर परिसरात बौद्धजन पंचायत समिती तर्फे काल ( दि.13) रात्री आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक संपवून घरी येत असताना ही घटना घडली. यावेळी मिरवणूकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रॉली वरील लोखंडी रॉड चा रस्त्यावरील रोहित्राला स्पर्श झाला. यामुळे रोहित्रामधील वीजप्रवाह संपूर्ण ट्रॉलीमध्ये पसरून ट्रॉली वरील सहा जण होरपळले.

गारपिटीमुळे द्राक्ष उकिरडयावर फेकण्याची वेळ; शेतकरी हतबल

यामधील रुपेश सुर्वे, सुमित सूत या दोघांचा मृत्यु झाला आहे. तर उमेश कनोजिया, राहुल जगताप, सत्यनारायण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अस्मित कांबळे या तरुणाची प्रकृती आता अगदी स्थिर आहे. दरम्यान याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली.

अजित पवार भाजपसोबत जाणार? भास्कर जाधव म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *