भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. आता अपघातानंतर पंतने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काळाने घातला घाला! दोन सख्ख्या बहिणींचा विहरीत बुडून मृत्यु
ट्विट करत ऋषभने लिहिले की, “सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे तुम्हाला कळवण्यास मला आनंद होत आहे. पुनर्प्राप्तीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय, जय शहा आणि सरकारी अधिकाऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानत आहे.”
शिवसेना कुणाची? आज निर्णय होण्याची शक्यता; निवडणूक आयोग देणार महत्त्वाचा निर्णय
I am humbled and grateful for all the support and good wishes. I am glad to let you know that my surgery was a success. The road to recovery has begun and I am ready for the challenges ahead.
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 16, 2023
Thank you to the @BCCI , @JayShah & government authorities for their incredible support.
त्याचबरोबर पंतने अजून एक ट्विट करत लिहिले की, “तुमच्या दयाळू शब्दांसाठी आणि प्रोत्साहनासाठी मी माझ्या सर्व चाहते, टीममेट, डॉक्टर आणि फिजिओ यांचे मनापासून आभार मानू इच्छितो”. असे ट्विट करत त्याने लिहिले आहे.
करोडपती शेतकऱ्यांच्या ‘या’ गावाबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क! फक्त एका पिकामुळे पालटले गावचे रूप