Chhagan Bhujbal । छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले; “सरकार खोटं बोलत आहे”

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha reservation) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. याबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे जीआर सुपूर्द केला. सरकारच्या या निर्णयामुळे मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी कोर्टात जाण्याचीही तयारी दर्शवली आहे. अशातच आता त्यांनी शिंदे-फडणवीसांवर (Shinde-Fadnavis) गंभीर आरोप केले आहेत. (Latest marathi news)

Nitish Kumar Resigned । सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

छगन भुजबळ हे सरकारवर नाराज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते आपल्या सिद्धगड निवासस्थानी बैठक घेणार असून त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सरकारकडून मराठा समाजाचा हट्ट पुरवण्याचं काम सुरु असून ओबीसी समाज मतदान करतो हे सरकारने विसरु नये”, असं म्हणत त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. (Chhagan Bhujbal vs Shinde-Fadnavis)

Shivsena Pratod । गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे राजकारणात भूकंप, शिवसेनेचे प्रतोद कोण? भरत गोगावले की कुडाळकर?

कोणावर अन्याय झाला नाही म्हणतात मग 54 लाख आणि त्याच्या दुप्पट तिप्पट लोक आणून ओबीसींना आरक्षणातून ढकलून देतात. आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजाच्या मनात निर्माण झाली आहे. मराठा समाज कोणत्याच दृष्टीने मागास नाही. गायकवाड आयोग कोर्टाने स्वीकारला आहे. परंतु, आता हे खोटं ठरवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत,” असा गंभीर आरोप छगन भुजबळांनी केला आहे.

Vinod Patil । याचिकाकर्ते विनोद पाटलांनी केलं स्पष्ट, “कोणताच निर्णय झाला नाही, विनाकारण..”

Spread the love