Loksabha Election 2024 । संपूर्ण राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची (Loksabha Election) जोरात तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अशातच लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी खेळी खेळली आहे. बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. (Latest marathi news)
Lok sabha Election । सर्वात मोठी बातमी! ..तर प्रायव्हेट कंपन्यांवर होणार कारवाई
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणसिंह राजे होळकर (Bhushan Singh Raje Holkar) शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. असे झाले तर धनगर समाजाची अनेक मते शरद पवार गटाला मिळू शकतात. माहितीनुसार, भुषणसिंह होळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांना हा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra politics । निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम
दरम्यान, संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत पार पडणार आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
Ajit Pawar । विरोधकांना बसणार धक्का! लोकसभेत विजयी होण्यासाठी अजितदादांची सर्वात मोठी खेळी