
मुंबई : केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनांमधून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतात. दरम्यान अशातच केंद्र सरकार 10 लाख तरुणांना नोकऱ्या देणार आहे. महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला आज शासकीय नोकरीसाठी 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत.
Sanjay Datt: “मी आता साउथचे सिनेमे जास्त करणार”, संजय दत्तचं मोठं विधान, कारण आल समोर…
दरम्यान या घोषणेनुसार येत्या आठवडाभरात 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सर्व विभागांना पत्र दिले आहे. तसेच सर्व विभागांच्या जाहिराती काढून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल, अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खासगी कंपन्यांमध्येही रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे येत्या एक वर्षात 75 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
चक्क माकडाने भरल्या डोळ्यांनी लावली अंत्ययात्रेला हजेरी, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
शासकीय सेवेतील रिक्त पदे भरणार
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट – ड पदांच्या भरतीसाठी TCS, IBPS मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शासकीय सेवेतील 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. खरतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य विभागातील नोकर भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या विभागाच्या परीक्षा अनेकवेळा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. दरम्यान त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयबीपीएस,टीसीएस आणि , एमकेसीएल यांसारख्या नामांकित आणि अनुभवी संस्थांमधून सरकारी खात्यांमध्ये भरती करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
आता मका पिकातील तण होणार नष्ट, ‘हे’ आहे नवीन तणनाशक जे ठरतंय रामबाण उपाय