शेती करायची म्हंटल की शेतीला पाणी द्यावं लागत आणि पाणी द्यायचं म्हंटल की वीज ही लागतेच. मात्र वीज बिलामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतीमधून जास्त उत्पन्न निघत नाही. शेतमालाला भाव देखील नाहीत. त्यामुळे वीजबिल भरणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
मोठी बातमी! अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईच निधन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) शेतकऱ्यांच्या विजेच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी बोलताना शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही देखील फडणवीसांनी दिली आहे. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना विजेबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.
ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आगामी तीन वर्षांमध्ये राज्यातील 30 टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत वीज मिळणार आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
होळीच्या दिवशी अश्लीलवर्तन झाल्यावर जपानी तरुणीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…