देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे लागणार नाहीत

Big announcement of Devendra Fadnavis! Panchnama of agricultural damage will not have to be done

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात (Maharashtra) परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे (Haivy rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmers) मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान अशातच आता शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे (state government) आहेत.

“पोलिस कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस द्या..”, अमित ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं भावनिक पत्र

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज शेतकऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले. यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात साडेचार हजार कोटी जमा झाल्याचं फडणवीसांनी (Devendra Fadanvis) सांगितलं आहे. तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

आनंदाची बातमी! भीमा पाटस कारखाना होणार लवकरच चालू

पुढे फडणवीस म्हणाले की, “कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून त्यांची तात्काळ पंचनामे केले जातील. हे पंचनामे सरकारकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल. इतकंच नाही तर दीह महिन्यात सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली आहे. “तसेच शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. या योजनेमुळे इथून पुढं शेतीत नुकसान झाल्यावर कोणत्याही शेतकऱ्याला पिकाचा पंचनामा करावा लागणार नाही. कारण सॅटेलाईट उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती सरकारला मिळेल.ही माहिती मिळाल्यानंतर लगेचच ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाणार” असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६ व्या वर्षी केले २३ वर्षीय मुलीशी गुपचूप दुसरं लग्न, कारण…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *