Vaidyanath Sugar Factory । पंकजा मुंडेंना मोठा दणका! तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Big bang for Pankaja Munde! Assets worth Rs 19 crore seized

Vaidyanath Sugar Factory । बीड : राजकीय गोटातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण मे महिन्यात जीएसटी (GST) विभागाने मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Cooperative Sugar Factory) कारवाई सुरु केली होती. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून (Central GST Commissionerate) या कारखान्याची तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (Latest Marathi News)

Loksabha Election 2024 । बारामती मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत. 6 महिन्यांपूर्वी जीएसटी आयुक्तालयाने धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती. यात या कारखान्याने (Beed Vaidyanath Sugar Factory) बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या कारखान्याला जीएसटी कराबाबत सतत नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतु या नोटिशीला कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही. त्यानंतर काल या कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे.

Ganesh Festival । काय सांगता? गणेश मूर्तीच्या डोळ्यात अश्रू, भाविकांची प्रचंड गर्दी

या कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी, सीबीआयचे छापे पडत होते. अशातच भाजपच्याच नेत्याच्या कारखान्यावर कारवाई केल्याने सर्वांना खूप धक्का बसला आहे.

Devendra Fadnavis । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांना नागपूरमध्ये संतप्त नागरिकांनी घातला घेराव

Spread the love