Lok Sabha Elections । बीडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच दादांचा निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ?

Lok Sabha Elections

Lok Sabha Elections । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्ववभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) निवडणुकीपूर्वी सतत धक्क्यांवर धक्के बसताना पाहायला मिळत आहे. नुकताच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी त्यांना सर्वात मोठा धक्का दिला. अशातच आता अजितदादांचा निष्ठावंत शिलेदार साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Hardik Pandya । हार्दिक पांड्या पुन्हा जखमी? समोर आली मोठी बातमी, पाहा व्हिडिओ

यंदा महायुतीकडून बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनवणे यांनी मागील वेळी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.

Navneet Rana । ब्रेकिंग! नवनीत राणा राजीनामा देणार? राजकीय घडामोडींना वेग

Ads

मागील आठ दिवसांपासून सोनावणे हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. बजरंग सोनवणे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचा बीडमध्ये चांगला जनसंपर्क आहे. मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच सोनवणे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी केली.

Lok Sabha Election । सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार, 7 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता

Spread the love