Ashes Series 2023 | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना (ENG vs AUS 2nd Test) लॉर्ड्समध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायन (Nathan Lion) याला मोठी दुखापत झाली आहे. प्रतिष्ठेची मानली जाणारी अॅशेस मालिकेत (Ashes Series) नाथनला आणखी सामने खेळायचे असून त्याच्या दुखापतीमुळे संघाचे आणि चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.
समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात! 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; तर अनेकजण जखमी
दरम्यान, या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने (Australia) आता 221 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. इंग्लंडची (England) या सामन्यात कमकुवत स्थिती आहे. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 325 धावा तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 45.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 130 धावा केल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही – पंंकजा मुंडे
त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू नाथन लायन याच्या गंभीर दुखापतीमुळे जर त्याला पुढील सामना खेळता आला नाही तर ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या दिवशी इंग्लंडला किती धावांचे आव्हान देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध इंग्लंड कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाच ठरेल.
अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी पार पडणार नवीन मंत्र्यांचा शपथविधी
हे ही पहा