BJP । लोकसभा निवडणुकांना (Loksabha Elections) अवघे काही महिने उरले आहेत. याच निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. यावर्षी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटल्याने निवडणुका आणखी अटीतटीच्या होणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. परंतु लोकसभा निडवणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. सर्वात मोठा पक्ष एनडीएतून (NDA) बाहेर पडला आहे. (Latest Marathi News)
Havaman Andaj । सावधान! येत्या 24 तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; घराबाहेर पडत असाल तर…
ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुनेत्र कळघम (AIADMK) हा भाजपचा मित्रपक्ष होता. परंतु या पक्षाने भाजपला रामराम ठोकला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच अण्णाद्रमुकची बैठक पार पडली. त्यात अण्णाद्रमुकचे डेप्युटी कोऑर्डिनेटर केपी मुनुसामी यांनी एनडीएतून बाहेर पडत आहे अशी घोषणा केली. पक्षाच्या या निर्णयामुळे दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Government Contractor । सरकारी रस्त्याचे ठेकेदार होण्यासाठी लायसन कसे मिळवायचे? शैक्षणिक पात्रता किती लागते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आगामी निवडणुकीत भाजपला तामिळनाडूत स्वबळावर मैदानात उतरावं लागेल, यात काही शंकाच नाही. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अण्णाद्रमुकने हा निर्णय घेतला आहे. पक्षाने मागील तशी घोषणा केली होती. मात्र काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत सर्वसंमत्तीने ठराव मंजूर करण्यात आला.