भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तामिळनाडू युनिटचे नेते एसजी सूर्या यांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा चेन्नई येथून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या राज्य युनिटचे प्रमुख के अन्नामलाई यांनी या कारवाईचा निषेध केला आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. (Tamil Nadu unit leader SG Surya arrested)
“…हे नामर्दनगीचं लक्षण”, अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक
पोलीस सूत्रांनी सांगितले की, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम) ने भाजपचे राज्य सचिव सूर्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जारी केलेल्या पोस्टच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सूर्या यांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
शेवटी प्रेमच ते! लग्नाच्या 7 दिवसानंतर नववधूने ठोकली प्रियकरासोबत धूम; दागिने, पैसेही केले लंपास
याबाबत अन्नामलाई यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “भाजपच्या तामिळनाडू युनिटचे राज्य सचिव सूर्या यांची अटक अत्यंत निषेधार्ह आहे. कम्युनिस्ट, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम) च्या मित्रपक्षांच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश करणे ही त्यांची एकमेव चूक होती.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.