Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? बड्या नेत्याच्या मुलाने बदललं सोशल मीडियावरील प्रोफाईल, होणार भाजपमध्ये प्रवेश?

Congress

Congress । नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या (Election 2024) तोंडावर काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी नुकताच पक्ष सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत याचा परिणाम पाहायला मिळेल. अशातच आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । अजितदादांच्या ‘त्या’ आवाहनावर शरद पवारांचं आव्हान; म्हणाले, “बारामतीतून कोणीही..”

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पार्टीचे नेता कमलनाथ (Kamal Nath) यांचे पुत्र नकुलनाथ (Nakul Nath) यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कमलनाथ आणि त्यांचे पुत्र छिंदवाडाच्या पाच दिवसांचा दौरा करणार होते. पण, अचानक त्यांनी तो रद्द करुन दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत! मोठं कारण आलं समोर

आज ते दिल्ली दौऱ्यावर असून नकुलनात काँग्रेस सोडतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. पण याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जरी त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar । चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांचा बारामतीतूनच हल्ला, म्हणाले; “चिन्ह काढलं की पक्ष संपला…”

Spread the love