मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप आणला होता. या भूकंपाचे हादरे आजही महाराष्ट्राच्या राजकारणाला बसत आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde – Fadanvis Government) स्थापन केले. यावेळी शिवसेनेतील जवळजवळ 40 आमदार व 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता देखील शिवसेनेतील काही नेते हळूहळू शिंदे गटात प्रवेश करत आहेत. सध्या विदर्भातील मूळ शिवसेनेचे काही जिल्हाप्रमुख शिंदे गटात येणार आहेत. अशी माहिती शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे.
शिर्डी: साईबाबा भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता थेट साईबाबांच्या समाधीला हात लावून घेता येणार दर्शन
येत्या हिवाळी अधिवेशनात हा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुख शिंदे गटात सामील होणार आहेत. इतकंच नाही तर खासदार कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे माजी आमदारही शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. हिवाळी अधिवेशनावेळी पूर्व विदर्भाचा एक मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) देखील उपस्थित असणार आहेत. याचवेळी या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सोपस्कर पार पडणार आहेत.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर माहिती
यासंबंधी माहिती देताना खासदार कृपाल तुमाने ( Krupal Timane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांपेक्षा शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून चांगले निर्णय घेतले आहेत. यामुळे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे मत तुमाने यांनी व्यक्त केले.
काय सांगता! घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घ्यावी लागणार