काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ

Big blow to Congress; Excitement due to the resignation of 'Ya' leader

पालघरमध्ये काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे? येथील एका काँग्रेस ( Congress) नेत्याने अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. पालघर जिल्हा चिटणीस अनंता वनगा ( Ananta Wanaga) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी चुकीच्या व्यक्तीची नेमणूक केल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि के एल राहूल अडकले लग्नबंधनात

मध्यंतरी डहाणू तालुक्यातील ऐना गावातील एक बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान वनगा यांनी त्याचा पाठपुरावा करून आरोपींवर गुन्हा दाखल केला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच काँग्रेस पक्षाने त्या आरोपीची काँग्रेस आदिवासी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखक असतानाच त्यास जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त करणे म्हणजे पक्षाची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे. ही बाब पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनंता वनगा यांनी हा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार? मोदींशी केली चर्चा

मागील 12 ते 13 वर्षे ते काँग्रेस पक्षात काम करत आहेत. वनगा यांनी पक्षासाठी केलेले काम पाहूनच त्यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. आजपर्यंत त्यांनी पालघर जिल्ह्यात ( Palghar District) खेडोपाडी फिरून पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्थानिक पातळीवर गोरगरीब व आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळासाहेबांमुळे मी स्वतःचा पक्ष काढू शकलो; राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *