
राज्याच्या राजकारणामध्ये खूप वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. कर्नाटकमध्ये आज सत्तास्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान यामध्येच आता मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच माजी मंत्री सुभाष महरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पेरणीआधी सरकार १० हजार रुपये देण्याच्या तयारीत? कृषिमंत्र्यांचे वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी व विरोधी पक्षनेता राजेंद्र राठौड यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्याने बंडखोर नेत्यांच्या घरवापसीचा टप्पा सुरू झाला आहे. 2016 मध्ये भाजपवर नाराज होऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री सुभाष महारिया यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मोठी बातमी! मंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात रंगली या’12 नावांची चर्चा!
सुभाष महारिया यांच्यासोबत माजी आयपीएस गोपाल मीना, माजी आयपीएस रामदेव सिंह खैरवा, माजी आयएएस पीआर मीना, डॉ. नरसी किराड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्य भाजप मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महारिया यांनी पुन्हा एकदा भाजपचे सदस्यत्व घेतले. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.