Eknath Shinde । मुंबई : मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवेसनेमध्ये (Shivsena) सर्वात मोठी फूट पाडली. भाजपसोबत (BJP) युती करत ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. यामुळे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) असे दोन गट पडले. विशेष म्हणजे ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळी अजूनही शिंदेंच्या गटात सामील होत आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांना एक धक्का देणारी बातमी आहे. (Latest Marathi News)
शिंदे गटातील कांदिवली, चारकोप आणि मालाडमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांच्याकडून पक्षात काम करु दिले जात नाही. त्यांच्या मानसिक छळाला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहे, असे या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी घेणार
दरम्यान, “आम्ही तुमच्यासोबत आहोत, परंतु कदमांना समज द्यावा”, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पत्रात केली आहे. राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पदाधिकाऱ्यांची नाराजी शिंदे गटाला महागात पडू शकते. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Jio Upcoming 5G Smartphone । ‘इतक्या’ स्वस्तात लाँच होणार जिओचा 5G फोन, मिळतील भन्नाट फीचर्स