देशात सध्या आयपीएलचे वारे वाहत आहे. दरम्यान आयपीएल नंतर भारतीय क्रिकेट संघ नवीन मोहिमेवर असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ( World Test Championship Finals) येत्या ७ जूनपासून ओव्हलवर खेळला जाणार आहे. यासाठी आयपीएल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ तयारीला लागणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना होणार आहे. मात्र या सामन्याची तयारी सुरू करण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
गौतमी पाटीलची राजकारणात चर्चा! अजित पवारांनंतर आता अब्दुल सत्तारही म्हणाले की…
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) दुखापत झाली आहे. सध्या तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीसोबत लढत आहे. यामुळे उमेश यादवला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या मधून बाहेर पडावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आधीच भरपूर अडचणींचा सामना करत आहे.
तुम्हीही Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी…
टीम इंडियातील ( Team India) जबरदस्त खेळाडूंपैकी जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर ( Jasprit Bumrah & Shreyas Ayyar) या दोघांनाही आधीच दुखापत झाली आहे. त्यामुळे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाहीत. या दोघांच्या जागी भारतीय संघ बदली खेळाडूंचा विचार करत आहे. असे असतानाच उमेश यादवच्या दुखापती बद्दलची माहिती टीम इंडियासाठी निराशाजनक आहे.
गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून लग्नात नातेवाईकांमध्ये वाद; झाली तुफान मारामारी