
राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर (Karnataka Assembly Elections) मविआमध्ये बैठकांचे सत्र चालू झालं आहे. आपण भाजपचा पुन्हा एकदा पराभव करू शकतो असा महाविकास आघाडीला विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक नेते पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. जनतेमध्ये संवाद साधून पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता गोंदियामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.
डॉक्टरांनी मृत घोषित केले, काही वेळातच मृत रुग्णाचे पाय हलले अन्…; पुढील घटना वाचून बसेल धक्का
गोंदियामधील राष्ट्रवादीच्या दोन नगराध्यक्षांनी आणि तब्बल पंधरा नगरसेवकांनी शिवसनेतमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
Gautami Patil | आडनावाच्या वादावरून गौतमी भडकली! म्हणाली, “पाटील आहे तर…”
मागच्या काही दिवसापासून अनेक राष्ट्रवादीतील बडे नेते आणि कार्यकर्ते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीला खिळखिळी करण्याचे काम भाजप आणि शिवसेना करत आहे. यामध्येच आता हा प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे.
सलग २४ तास सेक्स करणे व्यक्तीला पडले महागात; घडलं भयानक, वाचून तुम्हाला बसेल धक्का