शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते पक्ष सोडणार अशी चर्चा होती. यामध्येच आता राष्ट्रवादीतील काही नेते हे शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत तर काही नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
मोठी बातमी! अदानी समुहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स SBI कडे गहाण
आता राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला आहे.
गौतम अदानींमुळे वीज आणखी महागणार, छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत
दशरथ तिवरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खूप जवळचे समजले जातात. यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
एक मुलगा असूनसुद्धा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार; ‘या’ दिवशी करणार लग्न