Surekha Punekar | सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठंमोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. ठाकरे गटातील नेत्यांसोबत आता राष्ट्रवादीचे नेते देखील इतर पक्षात प्रवेश करू लागले आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
प्रसिद्ध तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या अचानक पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता. त्या राष्ट्रवादीत होत्या. मात्र त्यांनी अचानक आता बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगल्या आहेत.